व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-
‘आगामी स्पर्धेत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील कुस्तीपटूंचे विजय चौधरी मोठे आव्हान
असणार आहे. त्यामुळे खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रशिक्षणावर अधिक भर देत आहे. माझे काम सांभाळून मी हे प्रशिक्षण घेत आहे,’ असे ‘महाराष्ट्रकेसरी’ आणि सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी सांगितले. सलग तीनवेळा ‘महाराष्ट्रकेसरी’ विजेतेपद मिळविणारे चौधरी हे आगामी ऑल इंडिया पोलिस गेम्स स्पर्धेत कुस्ती खेळासाठी सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत वानवडी येथील एसआरपीएफ ग्रुप १ येथे होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत त्यापेक्षाही चांगली कामगिरी करण्याचा मानस चौधरी व त्यांचे मार्गदर्शक रोहित पटेल यांनी व्यक्त केला आहे.
Discussion about this post