व्हीएसआरएस मराठी न्युज –
जवळपास एक महिना हे कुस्तीपटू आंदोलनाला बसले असून त्यांची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळेच या महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंनीही देशवासियांना या लढ्यात सहभागी होण्याचे व पाठींबा देण्याचे आवाहन केले होते.
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे.
पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतलं.
ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात दोन खटलेही दाखल करण्यात आले आहेत. मात्र, जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे ठाम मत विनेश व बबिता फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया आंनी व्यक्त केले आहे. त्यातच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचय हस्ते देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. याच संसद भवनाच्या बाहेर हे कुस्तीपटू महिला कुत्सीपटूंसह महिलांची महापंचायत भरवणार आहेत. त्याला खाप पंचायतीनेही पाठिबा दिला आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवला. नवीन संसद भवनाकडे आगेकूत करणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी अडवलं. यावेळी कुस्तीपटूंनी पोलिसांचे बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आलं.
Discussion about this post