व्हीएसआरएस मराठी न्युज -२१ ते २३ जुलै अशी त्यांची महाराष्ट्रातील शिवसंवाद यात्रा असून प्रथम टप्प्यात भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी मधील समाजातील सर्व वयोगट आणि समाज बांधवांशी ते संवाद साधणार आहेत.
त्याचबरोबर सामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक आणि प्रामुख्याने तरुणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा हा दौरा असणार आहे. समाजकारण करत लोकांच्या समस्यांवर उपाय शोधून त्यांना चिंतामुक्त करणे हाच संकल्प असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या संवाद यात्रेला विशेष महत्त्व तर आहेच, पण त्याहून अधिक म्हणजे ही संवाद यात्रा समाजातील सर्व स्तरातील जनतेपासून ते शिवसैनिकांमध्ये नवीन ऊर्जा आणण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
शिव संवाद यात्रा वेळापत्रक – शिव संवाद यात्रेचा प्रारंभ हा २१ जुलै २०२२ रोजी भिवंडी ( Shiv Sanvad Yatra starts from Bhiwandi ) येथे दुपारी १२ वाजता संपन्न होणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्याने होणार असून प्रथम दिवसाच्या यात्रेची सांगता नाशिक येथे संध्याकाळी ६:३० या वेळेत होणाऱ्या जन मेळाव्याने होणार आहे.
दिनांक २१ जुलै २०२२ – दुपारी १२ वाजता भिवंडी येथे मेळाव्याने शिवसंवाद यात्रेला सुरुवात होईल. दुपारी २:३० ते २:५० शहापूर ( Shahapur ) येथे स्वागत संवाद. दुपारी ३:५० ते ४:१५ इगतपुरी ( Igatpuri ) येथे स्वागत संवाद. संध्याकाळी ५:४५ ते ६:४५ वाजता नाशिक येथे शिवसंवाद ( Shiv Samvad at Nashik ) .
दिनांक २२ जुलै २०२२ – या शिव संवाद यात्रेच्या द्वितीय दिवशी, सकाळी ११:४५ मनमाड शहरात संपन्न होणाऱ्या मेळाव्यात आदित्य ठाकरे जनतेला संबोधित करणार असून दुसऱ्या दिवसाच्या यात्रेची सांगता संभाजीनगर येथे सायंकाळी ६:३० वाजता होणाऱ्या मेळाव्याने होईल. सकाळी ११:४५ दुपारी १२:४५ मनमाड येथे शिवसंवाद मेळावा. दुपारी १:४० ते २:०० वाजेपर्यंत येवला येथे स्वागत संवाद. दुपारी २:४५ ते ३:०० वाजेपर्यंत वैजापूर येथे स्वागत संवाद. संध्याकाळी ५:३० ते ६:३० वाजता संभाजीनगर येथे शिवसंवाद मेळावा.
दिनांक २३ जुलै २०२२ – या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता पैठण येथे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले जाणार आहे. यात्रेची सांगता सायंकाळी ५:१५ शिर्डी येथे शिर्डी वासियांकडून आदित्य ठाकरे यांच्या स्वागताने तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री साईंच्या दर्शन आणि आशीर्वादाने होईल. सकाळी ११:३० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत पैठण येथे स्वागत संवाद. दुपारी २:०० ते २:२० गंगापूर येथे स्वागत संवाद. दुपारी २:५० ते ४:०० वाजेपर्यंत नेवासा येथे शिवसंवाद मेळावा. संध्याकाळी ४:४५ ते ५:१५ शिर्डी येथे स्वागत आणि दर्शन.
Discussion about this post