व्हीएसआरएस मराठी न्युज -महापालिकेच्या वतीने शहरातील विविध 25 ठिकाणी जिजाऊ क्लिनिक उभारण्यात येणार आहेत. जिजाऊ क्लिनिक उभारण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. तसेच, दापोडी ते निगडी, सांगवी फाटा ते किवळे बीआरटी मार्गावर जाहिरातीसाठी अत्याधुनिक स्ट्रक्चरल स्टीलचे होर्डिंग बसविण्यासाठीही सल्लागार नेमण्यात आला आहे.
क्लिनिक उभारणे तसेच, नवीन जाहिरात होर्डिंग धोरणानुसार दापोडी ते निगडी, सांगवी फाटा ते किवळे या दोन बीआरटी मार्गावर जाहिरातीसाठी अत्याधुनिक स्ट्रक्चरल स्टीलचे होर्डिंग बसविण्यात येणार आहेत.
त्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी कोटेशन नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेक प्रा. लि., चेतक इंजिनिअर्स, श्रीखंडे कन्सल्टंट प्रा. लि. या तीन एजन्सीचे दर प्राप्त झाले. त्यातील मॅप्स ग्लोबल सिव्हीलटेकची 1.95 टक्के कमी दर स्वीकृत करण्यात आला आहे. या सल्लागार एजन्सीला निविदा रक्कमेच्या 1.95 टक्के शुल्क देण्यात येणार आहे. त्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.
Discussion about this post