व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरीचिंचवड वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून विरुद्ध दिशेने वाहने चालवणे आणि ‘नो एंट्री’ केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली.
शहरातील 14 वाहतूक विभागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत 887 जणांवर कारवाई करून 4 लाख 96 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिसांनी वाहतुकीला शिस्त आणून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली आहे. विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सतीश माने म्हणाले की, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे जाम देखील होत असून अपघातात जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचेही बिनदिक्कत उल्लंघन केले जात आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अपघात रोखण्यासाठी वाहतुकीत शिस्त हवी. त्यासाठी बेफिकीर वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
Discussion about this post