व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पंजाब निकालानंतर आपचा पिंपरी-चिंचवड मधे जल्लोष करण्यात आले.
आम आदमी पक्षाची पंजाब मध्ये एकहाती सत्ता आली आहे
आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे फटाके व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आपचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना म्हटले दिल्ली नंतर पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचा दुसरा मुख्यमंत्री असणार आहे , पंजाब विधान सभेत आपच्या ९२ जागा निवडून आल्या आहेत .
त्यामुळे देशभरातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे , येणाऱ्या काळात बाकी राज्यांमध्ये आम आदमी पार्टी ताकत्तीनिशी उतरणार आहे असे ते म्हटले.
दिल्ली मॉडेलचा आदर्श घेऊन पंजाब मधील जनतेने आम आदमी पार्टी वरती विश्वास ठेवला आहे , पंजाब मध्ये निवडणूक काळात दिलेले आश्वासन आम आदमी पार्टी पूर्ण करूण देशासमोर आदर्श निर्माण करेल, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद,निवडणूका आम आदमी पार्टी लढवणार आहे , महाराष्ट्रातील जनता नक्कीच आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल देईल असे संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी म्हटले, या वेळी महिला अध्यक्ष स्मिता पवार, सामाजिक न्याय अध्यक्ष वहाब शेख, नंदू नारंग, इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी चेतन बेंद्रे,राज चाकणे,यशवंत कांबळे,वैजनाथ शिरसाट,नंदू नारंग,एकनाथ पाठक,स्वप्नील जेवळे,मंगेश आंबेकर,विजय अब्बाड,आशीतोष शेळके,वहाब शेख,अमर डोंगरे,स्मिता पवार,किशोर जगताप,सुरेंद्र कांबळे,उमेश साठे,रामेश्वर मुंडे,प्रकाश हगवणे,अशोक तनपुरे,चेतन चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post