व्हीएसआरएस मराठी न्युज -चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून २६ फेब्रुवारीला चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसकडे तीव्र इच्छुक उमेदवार आहेत. यापैकी सहा इच्छुकांनी शनिवारी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली आहे.
जर वरिष्ठांनी महाविकास आघाडीचा उमेदवार दिला, तर ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जबाबदारी शहर काँग्रेस घेणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सात फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
यावेळी चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मलशेट्टी, वरिष्ठ.. उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे संजय काळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, डॉ. मनीषा गरुड, प्रियंका मलशेट्टी, जमाते उलेमियाचे अध्यक्ष गुलजार भाई, हज्जू शेख, हसन इमाम पटेल, तेलगू समाज संघाचे अध्यक्ष बसवराज शेट्टी, ज्येष्ठ नागरिक संघाचे आनंद फडतरे, महात्मा गांधी व्याख्यानमाला संस्थापक अध्यक्ष बी. आर. माडगूळकर तसेच इस्माईल संगम, सय्यद मुर्तुझा, भारतीताई घाग, स्वप्निल बनसोडे, निखिल भोईर, जेवियर अंथोनी, सौरभ शिंदे, विजय इंगळे, प्रा. किरण खाजेकर, भानुदास ढोरे, तुकाराम कदम, अबूबकर लांडगे, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, सचिन कोंढरे, मिलिंद फडतरे आदींसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post