व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागात सावळा गोंधळ सुरु आहे. विभागीय करसंकलन कार्यालयात अधिकारी-कर्मचा-यांकडून मिळकतीचे मूळ अभिलेख गायब करणे, नोटराईजद्वारे बेकायदेशीर नोंदी करणे, मिळकतींना चुकीची करआकारणी करणे, एकाच दस्तावर नोंदी लावणे यासह अनागोंदी, भ्रष्ट गैरकारभाराबाबत करसंकलनच्या अनागोंदी, गैरकारभाराच्या तक्रारी विविध संघटना, नागरिकांनी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. तसेच करसंकलनच्या गैरकारभाराची दखल विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी देखील घेतली होती.
बिगरनिवासी मालमत्तेची निवासी दराने कर आकारणी करणे, मालकी हक्काचे कागदपत्राविना कर आकारणी करणे, ज्या वर्षामध्ये मालमत्ता कर आकारणी करणे आवश्यक होते. त्या वर्षामध्ये न करता पुढील आर्थिक वर्षामध्ये कर आकारणी करणे, योग्य कागदपत्राशिवाय मालक सदरी नाव लावणे, एकाच दस्तावर अनेक नोंदी लावणे, संपुर्ण मिळकतीची नोंद न करता त्यातून मिळकत नोदींची सूट देणे, अशा प्रकारे अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
महापालिकेच्या करसंकलन विभागीय चिखली आणि तळवडे झोनमधील प्रशासन अधिकारी, मंडलधिकारी, गटलिपिक, लिपिक यांच्या कामात अनियमितता आढळून आले आहे. त्या आठ जणांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या सर्व अधिकारी कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर करत झालेल्या चुका मान्य केल्या आहेत. त्या सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी कारणे दाखवा नोटीसीला खुलासा पाठविला आहे. मात्र, संबंधित अधिकारी-कर्मचा-यांनी आमची चूक झाली असून अनियमितता केल्याचे मान्य केले आहे. त्या सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची लवकरच खातेनिहाय चौकशी सुरु होणार असून त्यांच्यावर सेवानिलंबनाची कारवाई करण्यात येईल,..
Discussion about this post