व्हीएसआरएस मराठी न्युज –चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असतात. सध्या सहायक आयुक्त नीलेश देशमुख हे कर संकलन विभागाचे प्रमुख आहे. प्रशाकीय अडचण लक्षात घेऊन त्या विभागाचे प्रमुख म्हणून उपायुक्त ढोले यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी शुक्रवारी (दि.20) केली आहे.
कर संकलन विभागाचे ते प्रमुख झाल्याने त्यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
27 फेबु्रवारीला मतदान होत आहे. त्या निवडणुकीची आचारसंहिता संपूर्ण पुणे जिल्ह्यात बुधवार (दि.18) पासून लागू झाली आहे.
Discussion about this post