व्हीएसआरएस मराठी न्युज चिंचवड -चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. आज दिनांक ३१ जानेवारी रोजी विहित वेळेत माजी नगरसेवक राजेंद्र जगताप माजी नगरसेविका माया बारणे यांच्यासह सुमारे २० व्यक्तींनी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. प्राप्त उमेदवारांच्या अर्जांची छाननी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 10 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
पुणे शहर जिल्हा अधिकारी संतोषकुमार देशमुख हे कसबा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नामनिर्देशन अर्ज गणेश कला क्रीडा मंच येथे, तर चिंचवड विधानसभेसाठीचे नामनिर्देशन अर्ज थेरगाव येथील क क्षेत्रीय कार्यालयात स्वीकारले जातील.
या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Discussion about this post