व्हीएसआरएस मराठी न्युज –
पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यात 18 ठिकाणी मुक्काम असणार आहे. यादरम्यान आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह 8 ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये, 23 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 33 उपकेंद्रे येथील यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान, 110 शासकीय आणि 30 बीव्हीजी-108 च्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आरोग्य सेवेसाठी 20 लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्यामार्फत मोफत उपचार सुविधा पुरवली जाणार आहे. यामध्ये 112 वैद्यकीय अधिकारी आणि 336 आरोग्य कर्मचा-यांचा समावेश असेल. पालखी मार्गावर 2 फिरती पथके, रुग्णवाहिकांमध्ये 87 औषधोपचार पथके, 30 आरोग्यदूत आणि 25 उपचार केंद्रे अशी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी सोहळ्यादरम्यान दिंडीप्रमुखांना 740 औषध किटचे वाटप केले जाईल.
Discussion about this post