व्हीएसआरएस मराठी न्युज –चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी (दि. १५ व १६) धडक मोहीम राबवून सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.
महावितरणच्या शाखा अभियंता कृतिका भोसले व १७ सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. यानंतर नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची रिघ लागली आहे. तसेच या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरीयल बंच केबल लावण्यात येणार आहे.
महावितरणकडून आनंदनगर परिसरातील वीजचोरीविरोधी कामगिरीबाबत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सहायक अभियंता कृतिका भोसले यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. या मोहिमेला भोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे यांनीही सहकार्य केले. मुख्य अभियंता श्री. पवार यांनी आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्याची सूचना दिली व त्याचा आराखडा त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहे. येत्या १५ दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.
Discussion about this post