व्हीएसआरएस मराठी न्युज -21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे भव्य आयोजन पिंपरी चिंचवड मधील डी. आय. सी. एस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करण्यात आले.
21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला स्कूल मधील जवळपास 750 विद्यार्थी सहभागी होते व या योग दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 360 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संपूर्ण माहिती स्कूलमधील विद्यार्थी सरगम कुलकर्णी यांनी दिली.
स्कूल मधील मुला-मुलींनी जवळपास 78 रोजच्या सरावाची व स्पर्धात्मक योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
या 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संपूर्ण प्रोटोकॉल पूरक हालचाली, योगासने व प्राणायाम पुणे जिल्हा योग संस्थेचे अध्यक्ष मनोज काळे यांनी विद्यार्थी व शिक्षकांकडून करून घेतला
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डी. आय. सी. एस स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षा जोशी तसेच उपमुख्याध्यापिका सौ. सारिका कुलकर्णी उपस्थित होत्या .
या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन स्कूलमधील सौ.मानसी लेले मॅडम यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण नाईक यांनी केले.
Discussion about this post