व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-महाराणा प्रताप पुतळा समोर हातगाडी धारक ह्यांनी अतिक्रमण केले आहे तसेच रिक्षा रस्त्यावर उभ्या करून प्रवाशी वाहतूक थेट निगडी येथील महाराणा प्रताप पुतळा समोर सुरू असून वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत आहे.
फुटपाथ बंद करून त्या ठिकाणी हातगाडी धारक व्यवसाय करत आहे . दुसरीकडे रिक्षा रस्त्यावर आडव्या उभ्या करून प्रवाशी वाहतूक सुरू असून वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल खालून यमुनानगर कॉर्नर ह्या ठिकाणी जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे . यमुनानगर कॉर्नर ह्या ठिकाणी लक्ष देण्यात यावे आशी मागणी नागरिक कडुन होत आहे.
कै,मधुकर पवळे पुतळा शेजारी ४०/५० टपरीधारक ह्यांनी अतिक्रमण करून फुटपाथ संपूर्ण बंद केला असून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे नागरिकांना जाण्यासाठी येण्यासाठी फुटपाथ संपूर्ण बंद करण्यात आला असून शालेय विद्यार्थी जेष्ठ नागरिक महिला वर्ग ह्यांना निगडी भेळ चौक ते मधुकर पवळे पुतळा निगडी सिग्नल ह्या ठिकाणी जाण्यासाठी येण्यासाठी फुटपाथ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त दुबई दौऱ्यावर विकासकामे नावाखाली जात असून शहरातील मुख्य चौकात फुटपाथ नागरिक उपलब्ध करून देण्यात येत आहे .
तर दुसरीकडे दुबई दौऱ्यावर आयुक्त साहेब करोडो रुपये खर्च करून जात आहे सामान्य नागरिक ह्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
Discussion about this post