केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार निषेध आंदोलन
पिंपरी येथील आंबेडकर चौकात मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी
महिला तसेच पुरुष कार्यकर्त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग
पिंपरी-चिंचवड । व्हीएसआरएस न्यूज
मोदी सरकार हाय हाय, अमित शाह हाय हाय, मोदी सरकार हमसे डरती है , ईडी को आगे करती है, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत राज्याच्या अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा पिंपरी-चिंचवड शहरात तीव्र निषेध व्यक्त केला. इ़डीच्या तपास यंत्रणांनी पक्षपातीपणा करत ही कारवाई केलेली आहे.
यावेळी व्हीएसआरएस न्यूज सोबत बोलताना महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट म्हणाल्या की, त्यांनी मलिकांना इडी लावली. आम्ही त्यांना इडी लावू. व आगाामी काळात होणार्या निवडणूकांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता आणणार आहोत.असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता अल्हाट यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
Discussion about this post