व्हीएसआरएस मराठी न्युज –भारताच्या राष्ट्रपती सचिवालय कडून अग्निशमन सेवेतील जवानांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’ प्रदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’ प्रदान करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह , अतिरिक्त आयुक्त-1 प्रदिप जांभळे पाटील , सहायक आयुक्त तथा मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वतंत्रता जयंती पदका’ने सन्मानित करण्यात आले.
राज्यातील महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अग्निशमन विभागातील सर्व जवानांना अशा
प्रकारे सन्मानित करण्यात आले आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या
हस्ते सन्मानित करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Discussion about this post