व्हीएसआरएस मराठी न्युज –
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे मंगळवारपासून (ता. ११) विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे.
पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील मैदानात (पिंपरी चौक) कार्यक्रम होतील. शनिवारी (ता. १५) समारोप होणार आहे, अशी माहिती प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहा वाजता होईल. त्यानंतर साडेदहा वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर पिंपरी चौकातील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला जाईल. सकाळी १० वाजता शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा ‘नवयान महाजलसा’ प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल. साडेअकरा वाजता कुमार आहेर यांचा ‘मी ज्योतिराव फुले बोलतोय’ एकपात्री नाट्यप्रयोग होईल. दुपारी साडेबारा वाजता महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम. दोन वाजता गायक राहुल शिंदे व विजय सरतापे यांचे गीतगायन. साडेतीन वाजता राहुल कांबळे यांचा महामानवांच्या गीतांचा कार्यक्रम. सायंकाळी पाच वाजता ‘महामानवांना अभिप्रेत समतावादी समाज व्यवस्था व चित्रपट माध्यमांची भूमिका’ विषयावर परिसंवाद होईल. त्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल सहभागी होतील. सायंकाळी सात वाजता डॉ. किशोर वाघ यांचे ‘वामनाचा जत्था’ प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि रात्री साडेआठ वाजता मैना कोकाटे यांचे गीतगायन होईल.
Discussion about this post