व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ.अमोल दादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून व जगदंब प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १४/०८/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी शहिदांप्रती कृतज्ञता म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसाद कोलते व सौ.प्रिया प्रसाद कोलते यांच्या सहाय्याने यमुनानगर निगडी येथे देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.तब्बल १०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदानाच्या माध्यमातून देशभक्ती ही अनोखी संकल्पना असून याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिला.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, प्रदेश युवक सरचिटणीस, व पुणे जिल्हा प्रभारी विशाल काळभोर यांच्या हस्ते झाले.
यावेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.अजित गव्हाणे, मा.नगरसेवक विक्रांत लांडे, विनायक रणसुभे, अनिल भोसले, अक्षय माछरे, सोमनाथ कदम, सुनील राणे, रमेश निकाळजे व सर्व महिला पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते.
Discussion about this post