व्हीएसआरएस मराठी न्युज –74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त वाकड पोलीस स्टेशन येथे श्री फाउंडेशन व वाकड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन.
74 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त वाकड पोलीस स्टेशन येथे श्री फाउंडेशन व वाकड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य तपासणीसाठी डॉ. शितल नांदेडकर, डॉ.अनामिका उपासे, डॉ. ऐश्वर्या सोनवणे यांनी दंत तपासणी करून दाताची काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले, डॉ.सुनील कुंभार नेत्र तपासणी केले, व मागील महिन्यात राष्ट्रपातळीवरीचा ॲक्युपंक्चर स्टार अवॉर्ड 2022 मधील ए आय एम ए स्टार ॲक्युपंक्चर अवॉर्डनी सन्मानित झालेल्या डॉ. अशोक बाजीराव खोसे, डॉ. मकरंद काशिनाथ गावडे, व डॉ. अनिल पांडुरंग रामाने या तिघांनी चिरोप्रॅक्टर, नॅचरोपेथी, ॲक्युपंक्चर आरोग्य तपासणी करून त्यावर उपचार केले,
व काही लोकांना व्यायामाचे प्रकार सांगितले. आरोग्य तपासणीसाठी १२५ पोलीस स्टाफ, दक्षता कमिटी, शांतता कमिटीच्या लोकांनी या सेवेचा लाभ घेतला.
आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.काकासाहेब डोळे (उपायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) उपस्थित होते. तर वाकड पोलीस स्टेशनचे सत्यवान माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), रामचंद्र घाडगे (पोलीस निरीक्षक), संतोष पाटील (गुन्हे-पोलीस निरीक्षक), सुनील पिंजन (पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वाकड) दीपक गायकवाड , सचीन सुतार, व सर्व पोलीस स्टाफ हे उपस्थित असून आरोग्याचे आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
या वेळी डॉ. काकासाहेब डोळे (उपायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) उपस्थित होते. तर वाकड पोलीस स्टेशनचे सत्यवान माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), रामचंद्र घाडगे (पोलीस निरीक्षक), संतोष पाटील (गुन्हे-पोलीस निरीक्षक), दीपक गायकवाड , सचीन सुतार व सर्व पोलीस स्टाफ हे उपस्थित असून आरोग्याचे आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
या वेळी श्री फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुशांत पांडे, मार्गदर्शक संदीप शिंदे, व्यवस्थापक प्रशांत जाधव, दादाराव आढाव, डॉ. सतीश नगरकर,डॉ.रवींद्र दिवेदी, आप्पा कांबळे, अविनाश रानवडे आदींनी परिश्रम घेतले. प्रमुख पाहुणे काकासाहेब डोळे (उपायुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय) यांनी श्री फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष सुशांत पांडे , सर्व डॉक्टरांचे व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
फाउंडेशनचे संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच सत्यवान माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांनी फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करून आलेल्या सर्वांचेआभार मानले.
Discussion about this post