व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या शाळेला १ कोटी रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
महापालिकेच्या वतीने ‘जल्लोष शिक्षणाचा २०२३’ या उपक्रमांतर्गत दि १८ डिसेंबर ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हवामान आणि पर्यावरण, आरोग्य आणि स्वच्छता आदी विषयांवर अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
तसेच २४ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंतरशालेय स्पर्धा, गेम्स झोन, पुस्तकांचे स्टॉल, पपेट शो, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रश्नमंजुषा, ट्रेझर हंट या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल कार्निव्हलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामधील सर्वोत्कृष्ट मॉडेल्स बनविणाऱ्या ५ विद्यार्थ्यांना तसेच विजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या शाळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
Discussion about this post