व्हीएसआरएस मराठी न्युज -वडगांव नगरपरिषदेच्या मा.सदस्या, सौ.सुशीलाताई सावळेराम ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव मावळ बौद्ध विहार या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात आयु.स्वप्निल बाबा भालेराव, लिपिक – सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ग्रामीण दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांकरिता वही पेन दान करण्यात आले. कालकथित बाबा सदाशिव भालेराव यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच आधुनिक युगातील शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी वही पेन दान उपक्रम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्यक्षात राबिविण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सावळेराम ओव्हाळ, मावळ शिवसेना पक्षप्रमुख अनिलभाऊ ओव्हाळ, कामगारनेते नितीन आल्हाट, भाजपा वडगांव अनुसूचित जाती प्रमुख दीपकभाऊ भालेराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष अलोक प्रदिप गायकवाड, वडगांव मावळ सरचिटणीस सचिन ओव्हाळ, जनहित चॅर उपस्थित होते.
Discussion about this post