व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष डॉ कैलास कदम यांच्या मार्गदर्शन खाली आज वाकड येथे वृक्षांच्या बेकायदा कत्तली विरुद्ध युवक काँग्रेस चे आंदोलन करण्यात आले.
नुकतेच सोमवारी पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षतोडीच्या विरोधात दत्त मंदिर रोड, वाकड येथे आंदोलन करण्यात आले, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एका महिन्याच्या आत त्याच ठिकाणी झाडे लावावीत असा शासन आदेश असतानाही मोठा काळ उलटुन गेल्या नंतरही महानगरपालीके तर्फै झाडे लावण्यात आली नाहीत, या बाबत जबाबदारांवर कारवाई तसेच कायद्याने त्या झाडांचे पुन्हा रोपन करण्यात यावे, यासाठी युवकांनी मागणी आंदोलन केले.
“शासकीय आदेशाप्रमाणे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एका महिन्याच्या आत झाड लावणे बंधनकारक होते पण मोठा काळ उलटुन गेल्यानंतरही झाडे लावली नाहीत यामुळे संबंधीत अधिकार्यांवर व कंत्राटदारांवर कार्यवाई करावी”
असे बनसोडे यांनी सांगितले.
आंदोलनामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. झाडे लावा झाडे, जगवा, झाडे लावा श्वास वाचवा, जतन करा वृक्षाचे रोपण वाढवा, आयुष्य वाचवा, पर्यावरण जपा, अशी घोषणा देत पिंपरी चिंचवड पालिकेच्या उद्यान विभागातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
स्वप्निल बनसोडे (उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस) यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित वाकड युवक शाखा अध्यक्ष विक्रम कुसाळकर, उपाध्यक्ष रोहन मढीकर, संतोष ओव्हाळ, प्रकाश घोडके, अमोल देवकर, सागर हुंडे, अक्षय गायकवाड, उमेश पोकळे, प्रसाद शिरसाठे, सुमीत मंडल , निलेश अडागळे, रोहित भाट,सौरभ शिंदे,अभिजित आटोळे,करण सोनवणे,विजय माने रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे व युवक कार्यकर्ते तसेच नागरीकांनी आंदोलनास पाठिंबा दिला..
Discussion about this post