मावळ । व्हीएसआरएस न्यूज : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कामाचा राज्यभर डंका वाजतोय. मावळ मधे रस्त्यांचा विकास असो की परिसरातील अनेक समस्या आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. श्री क्षेत्र देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्याची अधिसूचना महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात घोषित केली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर आमदार सुनील शेळके यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्याने मार्गी लागला आहे. त्या मुळे देहू गावाच्या ग्रामस्थांचे आनंद गगनास मावेनासे झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सुनील आण्णा शेळके यांचे आभार व्यक्त केले.
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या बाबत आपल्या भावना व्यक्त करताना आमदार सुनील शेळके यांनी सांगितले कि “अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय आज पूर्णत्वास गेला. या कार्यात वारकरी भाविक भक्तांचे व ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र देहुचे स्वतंत्र अस्तित्व कायम रहावे ही जनभावना लक्षात ठेवून मला या निमित्ताने सर्वांची सेवा करण्याची संधी लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. या कार्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे अनमोल सहकार्य लाभले, त्याबद्दल श्री क्षेत्र देहु समस्त ग्रामस्थ बंधू-भगिनींच्या वतीने व वारकरी भाविक भक्तांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !
यावेळी नगरविकास खात्याचे उपसचिव सतिश मोघे, श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे, भानुदास मोरे, मा. सरपंच कांतीलाल काळोखे, रत्नमालाताई करंडे, मधुकर कंद, सचिन कुंभार, शंकरभाऊ काळोखे, अभिमन्यू काळोखे, अभिजित काळोखे, विशाल काळोखे, सचिन काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस देहु शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, युवक अध्यक्ष योगेश मोरे, योगेश परंडवाल, विकास कंद, उमेश मोरे, बापू म्हसुडगे व इतर मान्यवर उपस्थित होते.