व्हीएसआरएस मराठी न्युज –निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.
कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, त्यासाठी मतदार संघात ठिकठिकाणी मतदार जगृती कार्यक्रमांचे आयोजन करावे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचारी यांचे निवडणूक प्रक्रियेबाबत प्रशिक्षण महत्वाचे आहे. त्यातील बारकाव्यांची माहिती घ्यावी. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी आलेले आदेश तसेच परिपत्रकांचे अवलोकन करावे. कोविड संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
Discussion about this post