व्हीएसआरएस मराठी न्युज -माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी तब्बल दहा वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले.
कार्यकर्त्यांसह सर्वांसाठी हा सुखद धक्का होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना ‘आता नेहमी मी येत जाईन’, अशी प्रतिक्रिया कलमाडी यांनी दिली.
पुणे फेस्टिव्हलचं आमंत्रण महानगर पालिका आयुक्तांना देण्यासाठी आपण इथं आलो असल्याचं कलमाडी यांनी सांगितले. यावेळी 79 वर्षांचे सुरेश कलमाडी काठीचा आधार घेऊन चालत असल्याचे दिसले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, नगरसेवक आबा बागुल, संगीता तिवारी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतर सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना फारशी हजेरी लावली नव्हती.
Discussion about this post