व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाल रंगाचा आयशर टेम्पो (एमएच ११, सीजे ४०७५) कर्नाटकमधून येणार असल्याची खबर राजगड पोलिसांना मिळाली. यानुसार सापळा रचून हा संशयित आयशर टेम्पो राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला असता पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला. सदरचा टेम्पो खेड शिवापुर टोल नाक्यावर आला असता पोलिसांनी 70 लाखांच्या गुटख्यासह टेम्पो पकडून जप्त केला.
नामदेव मधूकर लवटे (वय २८ वर्षे रा.निजामपूर ता.सांगोला, जि.सोलापूर),चेतन दत्तात्रय खांडेकर (वय १९ वर्षे, धंदा टान्सपोर्ट, राहणार दत्त मंदिरा जवळ, सुतारदरा,कोथरुड, पुणे, मूळ रा.निजामपूर, ता.सांगोला, जि.सोलापूर) असे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींची नावे असून, या दोन आरोपींना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. तर गुटख्याचा पुरवठा करणारे शकीर निसार अलीमटटी (रा. विजापूर, कर्नाटक) व सद्दाम मेहबुब कोतवाल (रा.मंगोली, विजापूर कर्नाटक) या दोघांनी गुटखा पुरवल्याबद्दल त्यांच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
Discussion about this post