व्हीएसआरएस मराठी न्युज –वडगाव शेरीतील सोपाननगर येथे आज सकाळी भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीमुळे येथील दहा सिलिंडरचे स्फोटही झाले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण वडगाव शेरीचा परिसर हादरला आणि आग आणखी भडकली.
सोपाननगर भागात शुभम गार्डन सोसायटीशेजारी हे भंगारचे गोदाम होते. चारही बाजूंना पत्रा मारून भंगाराचा मोठा ढीग येथे साठवण्यात आला होता. सकाळी साडेअकराच्या वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशामक दलाला समजल्यानंतर येरवडा, धानोरी, नायडू, वाघोली, हडपसर भागातील केंद्रांवरून सहा बंब आणि चार टँकर मागवण्यात आले. तसेच परिसरातील १४ खासगी टँकर मदतीला घेण्यात आले. आग मोठी असल्याने ती विजवण्यासाठी ६० टँकर पाणी लागले.
भंगाराच्या गोदामात धातूचे साहित्य कापण्यासाठी ॲसिटिलीन हे ज्वलनशील गॅस असलेले सिलिंडर ठेवण्यात आलेले होते. त्यांचे दहा स्फोट झाले. तसेच भंगाऱ्याच्या गोदामात असलेल्या वाहनांचे फिल्टर, फोम, प्लास्टिक यामुळे आग अधिक भडकली.
Discussion about this post