व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुणे स्टेशनवर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खडकी येथे नवीन टर्मिनस व्हावे अशी सूचना खासदार गिरीश बापट यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली होती. याबाबत आज रेल्वेचे अधिकारी तसेच लष्करी अधिकारी यांनी संयुक्तिकरित्या खडकी रेल्वे स्टेशनची पाहणी केली.
शहरातील दळण -वळण सुविधा वाढवून त्याचा शहरावर होणारा ताण कमी करण्यासाठी खासदार गिरीश बापट प्रयत्नशील आहेत. म्हणूनच शहराच्या मध्यभागी असलेल्या पुणे स्टेशनचा भार कमी करण्यासाठी त्यांनी हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणे तसेच खडकी येथे नवीन रेल्वे टर्मिनल तयार करणे हे उपाय सुचवले आहेत. याबाबत त्यांनी संसदेत मागणी करून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार ही केला आहे.गेल्या महिन्यात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही त्यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनेवरून आज हा पाहणीदौरा आयोजित केला होता.
यामध्ये मध्यरेल्वे बोर्डाचे जनरल मॅनेजर अनिल लाहोटी, प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन्स मॅनेजर मुकुल जैन, मुख्य व्यवस्थापक मनजित सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापिका रेणू शर्मा, पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय संचालन डॉ.स्वप्नील नीला आदी अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
Discussion about this post