व्हीएसआरएस मराठी न्युज -11 ते 15 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे.
राज्यात सत्ताबदल होताच राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व असलेली खासदार शरद पवार अध्यक्ष राहिलेल्या कुस्तीगीर परिषदेची कार्यकाकणी बरखास्त करण्यात आली होती. भारतीय कुस्तीगीर संघानं घ्यायला लावलेल्या स्पर्धांचं आयोजनच होत नसल्याचा ठपका ठेवत भारतीय कुस्तीगीर संघानं ही करवाई करत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाची कार्यकारणीच रद्द केली होती.त्यानंतर या वाद न्यायालयात गेला होता.
बरखास्त केलेली जुनी कुस्तीगीर परिषद आणि भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त झालेली नवीन कुस्तीगीर परिषद या दोन्ही गटांनी स्पर्धा भरवण्याचा पवित्रा घेतल्यानं वाद निर्माण झाला होता. परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या बरखास्तीला न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई हायकोर्टाकडून कुस्तीगीर परिषदेचा आदेश रद्दबातल करण्यात आला होता.
जुन्या-नव्या कुस्तीगीर परिषदेच्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यात आला आहे. शरद पवार आणि बृजभुषण सिंग यांच्यातील चांगल्या संबधातून हा तोडगा काढण्यात आला आहे. बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे. ज्यानंतर आता रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी कुस्तीगीर परिषदेचे कामकाज पाहणार आहे. तसंच शरद पवार हे सल्लागार म्हणून या कुस्तीगीर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
अहमदनगर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धा वाडियापार्क येथे २५ ते ३१ डिसेंबरमध्ये रंगणार आहेत. स्पर्धा आयाेजनाचे पत्र राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आमदार संग्राम जगताप यांनी स्वीकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचे पत्र आमदार जगताप यांना दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा शरद पवार यांच्या हस्ते दिली जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
Discussion about this post