व्हीएसआरएस मराठी न्युज -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सोमवारी 30 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या परीक्षा आता आगामी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून हा निर्णय पुणे, नाशिक आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांसाठी लागू असेल असे विद्यापीठाने स्पष्ट केलेय.
पुणे विद्यापीठाने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांची हिवाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. मात्र नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही महाविद्यालये मतदान केंद्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे 30 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा 5 फेब्रुवारीला घेण्यात येतील. या संदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने संकेस्थळावर माहिती दिली आहे.
Discussion about this post