पिंपरी-चिंचवड । व्हीएसआरएस न्यूज ।
संत रविदास बहुउद्देशीय संस्थेतर्फे, संत रोहिदास महाराज जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. पिंपरी-चिंचवड, खेड, चाकण, लोणावळ, खंडाळा आदी ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास बहुउद्देशीय संस्था पिंपरी-चिंचवड शहरतर्फे, नाथभक्त सेवा मंडळ संभाजीनगर चिंचवड पुणे 19, संत रोहिदास महाराज उन्नती संस्था काळेवाडी पुणे, यांच्या संयुक्त विद्यमानाने नवा पठान वाडी, तालुका खंडाळा, व पांगुळली तालुका मावळ जिल्हा पुणे, येथे लहान मुलांचे बालसंस्कार वर्ग रविवार, दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, श्री बाळासाहेब सातपुते यांनी नाथ भक्त सेवा मंडळ संभाजीनगर चिंचवडचे, अध्यक्ष बळवंत बोर्डावर आणि संत रोहिदास महाराज संस्था काळेवाडी संस्थेचे अध्यक्ष सागर प्रल्हाद शिंदे.आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील लहान मुलांना योग प्रशिक्षण, शारीरिक व्यायाम, आणि शैक्षणिक मार्गदर्शन बाळासाहेब सातपुते यांनी केले करण्यात आले. आणि मुले व नागरिकांना खाऊ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले,सदर कार्यक्रमास संत रोहिदास महाराज उन्नती संस्थेचे सभासद मधुकर बुरुटे,नितिन विठ्ठल सूर्यवंशी तसेच सचिव, सचिन सुरवसे , सभासद गजानन बंडू कांबळे,दत्ता सूर्यवंशी, कविता ताई सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास वासंती राणे,सुरेखा सुर्वे,राजू कांबळे, इत्यादी देखील उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास मनशक्ती केंद्र लोणावळाचे प्रल्हाद बापर्डेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले, मनशक्ती केंद्राचे सेवेकरी कुणाल आरगडे, ओम दुसाने, यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, बळवंत बोर्डावर यांनी केले.
तसेच संत रोहिदास महाराज संस्था पिंपरी चिंचवड शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रविदास बहुउद्देशीय संस्थेतर्फे, लहान मुलांसाठी बाल संस्कार वर्गाचे आयोजन उत्साहात पार पडले.
संत रविदास बहुउद्देशीय संस्था पिंपरी चिंचवड शहर तर्फे, रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी पठारवाडी तालुका खेड चाकण जिल्हा पुणे, येथे लहान मुलांचे बाल संस्कार वर्ग घेण्यात आले. यावेळी श्री मधुकर सावंत आणि धनश्री ताई सावंत यांनी मुलांना शारीरिक व्यायाम, योग वर्ग, सामाजिक ज्ञान, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.तसेच स्वच्छता व आरोग्य इत्यादी विषयी, मोलाची माहिती दिली.
Discussion about this post