व्हीएसआरएस न्युज IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ निर्धारित 20 मध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला.
चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय शार्दुल ठाकूरने 3, जोश हेजलवूड, रवींद्र जडेजाने 2-2 विकेट, दीपक चहर आणि ड्वेन ब्रेबो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआर आणि सीएसके संघांनी या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. कर्णधार म्हणून धोनीचा हा 300 वा टी -20 सामना आहे. या पदावर पोहोचणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे. धोनीशिवाय, वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी 200 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये कर्णधार होणारा एकमेव खेळाडू आहे. धोनीने 213 सामन्यांमध्ये यलो ब्रिगेडचे नेतृत्व केले असून 130 विजय आणि 81 पराभव स्वीकारले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल 2010, 2011 आणि 2018 जिंकले आहे.
अंतिम सामन्यात विजेतेपद मिळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला सर्वाधिक २० कोटींचे बक्षीस मिळाले. तर, उपविजेत्या ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला १२.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याशिवाय प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेले अन्य दोन संघ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ८.७५ कोटींचे बक्षीस मिळाले.
याशिवाय अनेक खेळाडूंनीही यंदा विविध पुरस्कार मिळवले. त्यामुळे त्यांना मोठी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळाली आहे. यंदा पुरस्कार विजेत्यांनी किती बक्षीस रक्कम मिळाली हे जाणून घेऊ या.
आयपीएल २०२१ चे पुरस्कार
विजेते- चेन्नई सुपर किंग्स – २० कोटी रुपये
उपविजेते- कोलकाता नाईट रायडर्स – १२.५ कोटी रुपये
क्वालिफायर २ मध्ये पराभूत संघ – दिल्ली कॅपिटल्स – ८.७५ कोटी रुपये
एलिमिनेटरमध्ये पराभूत संघ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – ८.७५ कोटी रुपये
अंतिम सामन्यातील सामनावीर- फाफ डू प्लेसिस, चेन्नई सुपर किंग्स – ५ लाख रुपये
ऑरेंज कॅप- ऋतुराज गायकवाड (६३५ धावा), चेन्नई सुपर किंग्स – १० लाख रुपये
पर्पल कॅप- हर्षल पटेल (३२ विकेट्स), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १० लाख रुपये
सर्वाधिक षटकार – केएल राहुल (३० षटकार), पंजाब किंग्स – १० लाख रुपये
एमर्जिंग प्लेअर- ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्स – १० लाख रुपये
सर्वोत्तम झेल – रवी बिश्नोई (सामना २१, फलंदाज – सुनील नारायण), पंजाब किंग्स – १० लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सिजन – शिमरॉन हेटमायर, दिल्ली कॅपिटल्स – १० लाख रुपये
गेम चेंजर – हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १० लाख रुपये
पॉवर प्लेअर – व्यंकटेश अय्यर, कोलकाता नाईट रायडर्स – १० लाख रुपये
व्यॅल्युएबल प्लेअर- हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – १० लाख रुपये
फेअर प्ले अवॉर्ड- राजस्थान रॉयल्स – १० लाख रुपये
Discussion about this post