व्हीएसआरएस न्युज आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (MI vs CSK) यांच्यात होणार आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7 वाजता होईल. मुंबई चौथ्या क्रमांकावर आयपीएल 2021 च्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चौथ्या क्रमांकावर आहे. टीमने 7 पैकी 4 मॅच जिंकल्या, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीची टीम 8 पैकी 6 मॅच जिंकत 12 पॉईंट्ससह टॉपवर आहे.
Discussion about this post