व्हीएसआरएस न्युज दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली आहे.
दरम्यान ऋतुराज गायकवाडची विकेट गेल्यानंतर एमएस धोनी फलंदाजीसाठी आला होता. धोनीने १९ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर जोरदार षटकार लगावला आणि आव्हानापर्यंतची वाट सोपी केली. शेवटच्या षटकात १३ धावांची आवश्यकता होती. यावेळी स्ट्राईकवर असलेला मोईन अली करनच्या पहिल्याच चेंडूवर रबाडाच्या हातून झेलबाद झाला. यानंतर जडेजा खेळपट्टीवर आला खरा, पण स्ट्राईक धोनीकडे होती. धोनीने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन चौकार लगावले. यानंतर करनने पुढील चेंडू वाईड टाकला. यावेळी चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर धोनीने चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार मारत सामना खिशात घातला.
Discussion about this post