व्हीएसआरएस न्युज पिंपरी -माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका शर्मिला राजेंद्र बाबर आणि निगडी प्राधिकरण भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकार सभागृहात शुक्रवारी (दिनांक २४ डिसेंबर २०२१) ही चित्रकला स्पर्धा पार पडली. १२ ते १४ या वय़ोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे १२० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल तयार करून लवकरच या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ घेण्यात येणार आहे. या प्रसंगी नगरसेविका शर्मिलाताई बाबर, राजेश कडू, प्रसाद जोगळेकर, नारायण पांडे, सागर सोनावले, प्रवीण पाटील, संतोष जगदाळे व ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे परिक्षक अशोक कामठे सर, भापकर सर, उषा मोरे मॅडम आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना नगरसेविका शर्मिला बाबर म्हणाल्या की, “कठिण, खडतर सामना करत अटलजींनी आपल्या धेय्याकडे वाटचाल केली. कठिण परिस्थितीचा सामना करताना त्यांच्यातला कवी, संवेदनशील माणूस नेहमी जागृत राहिला. त्यांच्याकडून ही प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. आपल्या कला-गुणांना वाव द्यावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली”.
Discussion about this post