व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -निगडी येथील दुर्गादेवी उद्यानाच्या देखभाल-संरक्षणासाठी निविदा प्रक्रीयेत 1 कोटी 50 लाख रूपये दर अपेक्षित धरण्यात आला होता.
तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी निविदा दरापेक्षा 30 टक्के कमी म्हणजेच 1 कोटी 5 लाख रूपये हा लघुत्तम दर सादर केला.
भोसरी सहल केंद्र आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृहातील उद्यान देखभाल व संरक्षणाच्या कामासाठी तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी 1 कोटी 79 लाख 45 हजार रूपये असा लघुत्तम दर सादर केला. हा दर निविदा अंदाजपत्रकीय दर 1 कोटी 85 लाख रूपयांपेक्षा तीन टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यात आला आहे.
प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या (गणेश तलाव) देखभाल आणि संरक्षणाचे कामकाज करण्यात येणार आहे. या कामासाठी अजित स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था यांनी 1 कोटी 25 लाख 57 हजार रूपये असा लघुत्तम दर सादर केला. हा दर निविदा अंदाजपत्रकीय दर 1 कोटी 64 लाख 72 हजार रूपयांपेक्षा 23.77 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यात आला आहे. या चार उद्यानांच्या देखभाल व संरक्षण कामकाजासाठी एकूण 4 कोटी 87 लाख 14 हजार 372 रूपये खर्च होणार आहे.
Discussion about this post