व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील गुजरात टायटन आणि दिल्ली कॅपिटल या क्रिकेट मॅचवर आरोपी सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काळेवाडीतील राजवाडेनगर येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून आठ मोबाईल, जुगारासाठी लागणारे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 27 लाख 25 हजार 450 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींकडून आठ मोबाइलसह 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राजवाडेनगर, काळेवाडी येथे पोलिसांनी शनिवारी (दि.2) सायंकाळी ही कारवाई केली.
सनी उर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल (वय 38, रा. काळेवाडी) रिक्की राजेश खेमचंदानी (वय 36 रा. डीलक्स थिएटरमागे, पिंपरी), सुभाष रामकिसन अगरवाल (वय 57, रा. रेल्वे स्टेशनजवळ, पिंपरी) आणि सनी सुखेजा (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हजरतअली पठाण यांनी रविवारी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Discussion about this post