व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -पिंपरी-चिंचवड शहर माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने बालदिनानिमित्त भव्यदिव्य स्वरूपात सर्वांसाठी आयोजित केलेल्या मोफत बालजत्रेला बालक-पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमांचा मुलांनी मनमुराद आनंद लुटला. जत्रेत सहभागी झालेल्या मुलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या.
यंदाच्या बालजत्रेला बालक-पालकांची तुफान गर्दी झाली. मुलांनी जत्रेचा मनमुराद आनंद लुटला. जत्रेत खाऊचे स्टॉल मोफत लावले होते. मुलांनी विविध पदार्थ चाखून मनसोक्त आनंद घेतला. खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमाला मोठा मिळाला. खाऊ, खेळणी सर्व मोफत ठेवण्यात आले होते. तसेच जत्रेत सहभागी झालेल्या मुलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या. मुलांच्या चेह-यावर मोठा उत्साह होता. त्यांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
कुटे म्हणाले, “कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुले मुक्तपणे संचार करु लागले आहेत. दोन वर्षानंतर मास्कविना बाहेर पडलेल्या मुलांनी बालजत्रेचा मनसोक्त आनंद घेतला. जत्रेतील खाऊगल्ली, मनोरंजन कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला, मुलांच्या चेह-यावरील आनंद, समाधान, उत्साह पाहुन आयोगाच्या सर्व पालक वर्ग यांनी समाधान व्यक्त केले.
Discussion about this post