व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली- चिखली भागातील मैत्री चषक २०२२ भव्य दिव्य पावसळी रबरी बाॅल फुलपीच क्रिकेट स्पर्धा चे आयोजन केले आहे .
उद्घाटनप्रसंगी स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहुन खेळाडू व आयोजकांना दिनेश यादव यांनी शुभेच्छा दिल्या व उपस्थित तरुणांनी क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांच्या या विनंतीचा मान राखून यादव यांनी क्रिकेट खेळाचा आनंद लुटला.
चालू घडीला शहरपातळीवर विविध क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. तसेच या क्रिकेट स्पर्धामध्ये शहरातील खेळाडू उत्कृष्ठ कामगिरी देखील करताना दिसत आहेत.यादव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले जर तरुण तरुणींना थोडसं पाठबळ आणि संधी मिळाली तर ते संधीच सोनं करून शकतात यात कुठलीही शंका वाटत नाही.
या स्पर्धामधून खेळाडूनां एक व्यापक दिशा मिळेल. प्रत्येक खेळातील क्षण हे निंतांत आनंद देऊन जातात. यादव म्हटले कि खूप दिवसांनी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. बऱ्याच दिवसांनी तरुणांच्या आनंदात प्रत्यक्ष सामील होता आले याचा आनंद आहे.
Discussion about this post