व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड चे माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि आपुलकी जेष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ अजित शितोळे यांच्या वतीने भव्य हाफ पिच क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन आकुर्डी येथील महापालिका शाळेच्या मैदानावर करण्यात आले.
यावेळी मा नगरसेविका ऊर्मिलाताई काळभोर , विजय बोर्हाडे आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते निहाल पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन करीम इनामदार यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष चौधरी यांनी केले आणि आभार अतुल शितोळे यांनी मानले.
Discussion about this post