व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा सातारा जिल्ह्यात अनुभवायला मिळणार आहे.
तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. 1963 साली ही स्पर्धा साताऱ्यात झाली होती. यंदा 36 जिल्ह्यातील 45 संघ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात एकूण 900 मल्लांचा समावेश असेल. यावेळी 50 हजार प्रेक्षक बसतील एवढी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. छत्रपती शाहू स्टेडीयम या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे.
Discussion about this post