व्हीएसआरएस मराठी न्युज -नवी मुंबई – ऐरोली येथे सी.आय.एस.सी.ई आयोजित आंतरशालेय राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला.
दि. ८, ९, १० ऑक्टोबर रोजी आर्टिस्टिक जिम्नास्टिकच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र ,कर्नाटक , झाशी , तामिळनाडू , दक्षिण भारत, उत्तराखंड , पश्चिम बंगाल या राज्यांनी सहभाग घेतला होता. एलिट जिम्नॅस्टिक्स अँड फिटनेस अकॅडमी, पिंपरी चिंचवड मधील १४ वर्षे वयोगटात युरो स्कुल पुणे येथे शिकणारी कु. संस्कृती सामंत या खेळाडूला फ्लोअर एक्सरसाइज या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक प्राप्त झाले तसेच संघात पाचवा क्रमांक मिळविला आहे. या स्पर्धेत अंदाजे २२० खेळाडू सहभागी झाले होते. कु. संस्कृती सामंत हिचे प्रशिक्षण पिंपरी चिंचवड मधील एलिट जिम्नॅस्टिक्स अकादमी च्या मुख्य प्रशिक्षक श्री मनोज काळे सर यांच्याकडे चालू आहे.
Discussion about this post