व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड मधून पहिल्यांदाच आर्टिस्टिक जिम्नास्टिकच्या अंबाला, हरियाणा येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स २०२२ स्पर्धेत खेळाडू कु. हर्षिता काकडे हिची निवड झाली.
असून गेली ५ वर्षे एलाईट जिम्नॅस्टिक्स अँड फिटनेस अकादमीचे मुख्य प्रशिक्षक मनोज काळे व प्रिया जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
१४ नोहेंबर २०२१ रोजी डोंबिवली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तीची निवड झाली.
२२ ते २६ नोव्हेंबर २०२१ जम्मू येथे झालेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स च्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला उपविजेतेपद मिळाले व खेलो इंडिया स्पर्धेसाठी संघाची निवड झाली. या सर्व निवड झालेल्या संघाचा सराव कॅम्प दिनांक २१ मे ते २ जून बालेवाडी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता व २ जून रोजी संघ हरियाणा अंबाला येथे दि. ५, ६, ७ जून रोजी होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स साठी रवाना झाला आहे.
Discussion about this post