व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –पिंपरी: दि- १३ फेब्रुवारी २२:- जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून एलाईट जिम्नास्टिक अँड फिटनेस अकॅडमीच्या सर्व विद्यार्थी पालक यांनी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प पूर्ण केला. रथसप्तमी किंवा 12 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो. या दिवशी सूर्य नमस्कार करण्याचा संकल्प केला व 1 जानेवारी 2022 पासून सर्व विद्यार्थी व पालकांनी सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात केली व प्रथम दिवशी 13 सूर्य नमस्कार करून 12 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येकी 101 सूर्यनमस्कार घालून संकल्प पूर्ण केला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे बजरंग गडदे, अतुल इनामदार, दत्तात्रय जानराव, विजय शिनकर, मंगेश जोशी व एलाईट जिम्नास्टिक अँड फिटनेस अकॅडमीचे अध्यक्ष मनोज काळे उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी 14 मुलींनी अंदाजे 180 योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले तसेच खेलो इंडिया स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जिम्नास्टिकचा डेमो सादर केला. या कार्यक्रमाचे संपुर्ण सूत्र संचालन सौ. प्रिया जोशी व श्री. चैतन्य जोशी यांनी केले.
या सूर्यनमस्काराचा दिनाचा कार्यक्रम अकॅडमीच्या सौ. मोनिका काळे , लक्ष्मण नाईक , हिमांशू चौगुले , संदीप पाटील , अनंत सामंत , परेशा आरे , व महिला वर्ग यांनी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला .
Discussion about this post