व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी (ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदीतील चार नंबर शाळे समोरील मैदान सद्यस्थितीत वारंवार दुरवस्थेत दिसून येत आहे. आळंदीतील मागील काही वर्षांमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामार्फत कामे चालू असताना ही येथे त्यासंबंधीत ठेक्केदाराचे साहित्य मैदानावर होते.
आता सध्या त्रयस्थ व्यक्तींनीच काही दिवसांपूर्वी मातीचे ढीग या मैदानावर टाकलेले दिसून येत आहेत.आळंदी नगरपरिषदेने येथे टाकलेल्या लोखंडी कचरा कुंड्या ही तश्याच दुरवस्थेत दिसून येत आहेत.या मैदानावर सकाळी व संध्याकाळी मुले विविध खेळ खेळताना दिसत असतात.शहराच्या विविध भागातून मुले येथे मोठ्या प्रमाणावर खेळ खेळण्यासाठी येत असतात.त्यापैकी येथे मुले क्रिकेट,फुटबॉल हे खेळ खेळण्यासाठी मोठया प्रमाणात जमतात.सध्याच्या परिस्थितीत मैदानावर मातीचे मोठ मोठे ढीग असल्याने मुलांना तेथे खेळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.तसेच शेजारच्या लहान मुलांसाठी असणाऱ्या बगिच्यात लहान मुलांचे खेळणी साहित्य ही दुरवस्थेत असल्याने त्याचा ही वापर होत असताना दिसत नाही. सध्या बगिच्यात वृक्ष रोपणाचे ही काम चालू असल्याचे दिसत आहे.बगिच्यातील खेळ ,हे तिथल्या खेळण्यासाठी असणाऱ्या खेळणी पुरतेच मर्यादित स्वरूपाचे असतात.
केंद्र सरकरपासून नगरपालिकेपर्यंत विध्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.चाकण रस्त्या जवळील नगरपालिकेची शाळा वगळता सध्या भरत असणाऱ्या नगरपालिकेच्या ईतर शाळेसमोर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानेच नाहीत.जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे.मात्र खेळण्यासाठी मोठे मैदानच नसल्याने मुलांना चांगले खेळाडू घडण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
चार नंबर शाळा ही धोकेदायक घोषित केल्याने तेथील शाळा नगरपालिकेच्या जवळ असणाऱ्या नगरपालिकेच्या गाळ्यांच्या वरच्या मजल्यावर भरत असते .चावडी चौकात आळंदी नगरपालिका शाळेची मोठी ईमारत आहे पण शाळे समोर खेळण्यासाठी मैदानच नाही.
चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर विद्यालय व नगरपरिषदेच्या शाळेच्या मैदाना मध्येच लोखंडीजाळीने तयार केलेले मोठे कुंपणच आहे. चाकण चौक येथे नगरपरिषदेच्या शाळेच्या मैदानाच्या जागेत आळंदी शहरातील एका विभागाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी व नगरपालिकेची मोठी शौचालयाची ईमारत ही येथे आहे. त्यामुळे तिथे ही मुलांना पुरेसे खेळण्यासाठी मोठे मैदान दिसून येत नाही.मुलांना असणाऱ्या मोकळ्या वेळेत व सुट्टीच्या वेळी दिवसभर मुलांनी खेळायचे तरी कुठे?असा प्रश्न आळंदी शहरात निर्माण झाला आहे.आळंदीत मुलांसाठी खेळण्यासाठी असणारे हे मोठे मैदान ही दुरवस्थेत असल्याने नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Discussion about this post