व्हीएसआरएस मराठी न्युज –
ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणारी आंतररष्ट्रीय हॉकी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यत काही महिने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.
शहरात खेळांसदर्भात जागृती निर्माण व्हावी, स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ पाहता यावा म्हणून सहा देशांची कनिष्ठ पुरूष गट हॉकी स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे नोव्हेंबर 2022 ला करण्यात येणार होते. त्यासाठी तब्बल साडेपाच कोटी रूपये खर्च करून प्रकाश व्यवस्थेसाठी चार खांब्यावरील दिवे बदलण्यात आले. तसेच, सुमारे पाच कोटी खर्च करून स्टेडियमध्ये पुन्हा सुशोभीकरण करण्यात आले. मात्र, ओडिसामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात होणारी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण १६ देश सहभागी होत आहेत. सहभागी राष्ट्रांची प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
कटक येथे बुधवारी (११ जानेवारी) हॉकी विश्वचषकाचे उद्घाटन झाले. १३ जानेवारीपासून (शुक्रवार) लढती सुरू होणार आहेत. अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आयोजनासंदर्भात हॉकी इंडिया महासंघाशी पत्रव्यवहार सुरू आहे. तसेच ओडिसामध्ये हॉकीचा विश्वचषक सुरू आहे. स्पर्धेला अव्वल संघ असावेत यामुळे शहरातील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत.
– बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग
Discussion about this post