व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट फाऊंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातून आता पर्यंत २० ते २५ नेमबाज राष्ट्रीय पातळीवर खेळत असून काही नेमबाजांची निवड ही भारतीय टीम सिलेक्शन ट्रायल मध्ये निवड सुद्धा झाली आहे.
महाराष्ट्र रायफल असोसिएशनने आयोजित केलेली राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धा २०२२ मध्ये अरुण पाडुळे स्पोर्ट फौंडेशनच्या अनुष्का बाबर (सुवर्णपदक व रौप्यपदक), अनुष्का गारगोटे (सुवर्णपदक), सांची राहुल नेवाळे (सुवर्णपदक व रौप्यपदक), अथर्व सुतार (सुवर्ण पदक) यांना १० मीटर एअर पिस्तुल राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळाले असून सर्व स्तरातून प्रशिक्षक अरुण सर पाडुळे व सर्व नेमबाजांचे कौतुक केले जात आहे.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात संपुर्ण महाराष्ट्र मधून विविध गटात ५०० हुन अधिक नेमबाजांनी सहभाग नोंदवला त्यातील युथ गट, ज्युनियर गट, सिनियर गट. मध्ये अरुण पाडुळे स्पोर्ट असोसिएशनच्या अस्मिता गुरव, भक्ती नारायनकर, पंकज कातोरे, राजनंदिनी जितेंद्र यादव या सर्व नेमबाजांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करत पिंपरी चिंचवडच नाव राज्य
पातळीवर लौकिक केले असून या सर्वांची निवड गुजरात येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धे साठी झाली आहे.
अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे यांनी पूर्व राष्ट्रीय तही नक्कीच नेमबाज मेडल घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पिंपरी चिंचवडच नाव नेमबाजी मध्ये पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट फाऊंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातून आता पर्यंत २० ते २५ नेमबाज राष्ट्रीय पातळीवर खेळत असून काही नेमबाजांची निवड ही भारतीय टीम सिलेक्शन ट्रायल मध्ये निवड सुद्धा झाली आहे. अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून सह प्रशिक्षक कविता अरुण पाडुळे मुलांना मार्गदर्शन करीत आहेत.
Discussion about this post