व्हीएसआरएस मराठी न्युज -रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची उद्या बुधवार, 16 फेब्रुवारीपासून टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम सुरू होणार आहे.
कारण आठ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यात बुधवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सलामीचा टी-20 सामना रंगणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी-20 संघाच्या मोर्चेबांधणीसाठी संघनिवड समितीच्या नजरा ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर आदी युवा खेळाडूंच्या कामगिरीवर असणार आहेत.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड़, दीपक हुड्डा, कुलदीप यादव आणि हरप्रीत बरार
वेस्ट इंडिज : किरोन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन ॲलेन, डेरेन ब्रावो, रोस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमीनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, ब्रेंडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर.
Discussion about this post