व्हीएसआरएस मराठी न्युज –नेहरूनगर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे श्री बी एन भूषण सहसंचालक हॉकी इंडिया ,श्री विक्रम सिंग वरिष्ठ व्यवस्थापक हॉकी इंडिया अतिरिक्त आयुक्त श्री जितेंद्र वाघ यांनी सहा राष्ट्राच्या 16 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 या काळात होणाऱ्या ज्युनिअर इंटरनॅशनल हॉकी स्पर्धा च्या अनुषंगाने करावयाची कामे वपूर्वतयारी अनुषंगाने भेट देउन पाहणी केली.
तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली .अतिरिक्त आयुक्त श्री जितेंद्र वाघ यांनी सर्व विभागप्रमुख यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या .सदर भेटी च्या वेळी उपायुक्त श्री विठ्ठल जोशी क्रीडा विभागाचे प्रमुख श्री बाळासाहेब खांडेकर शहर अभियंता श्री मनोज सेठिया,श्री संजय खाबडे सहशहर अभियंता विद्युत श्री रवींद्र पवार आदि उपस्थित होते.
उद्योगनगरी, कामगारनगरी आणि सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले शहर असा नावलौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला “स्पोर्टस् हब” म्हणून विकसित करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. त्यादृष्टीने शहरात विविध खेळांच्या स्पर्धांचे राष्ट्रीय पातळीवर आयोजन केले जात आहे.
Discussion about this post