व्हीएसआरएस मराठी न्युज -भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची (Viswanathan Anand) रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची (FIDE) उपाध्यक्षपदी निवड झालीय.
विद्यमान अध्यक्ष आर्केडी वोर्कोविच हे दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आले आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड 44 व्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे काँग्रेसदरम्यान या निवडणुका झाल्या आहेत. पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या विश्वनाथन आनंद ड्वोरकोविचच्या संघाचा भाग होता. ड्वोर्कोविचला एकूण 157 मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी आंद्री बॅरीशपोलेट्स यांना केवळ 16 मते मिळाली. यातील एक मत अवैध ठरलं. तर, मतदानात सहभागी झालेले पाच जण गैरहजर राहिले आहेत.
Discussion about this post